बहिणीबद्दल अपशब्द काढल्याने युवकाला चाकूने भोकसले


ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी


माझ्या बहिणीबद्दल अपशब्द का काढतो याचा राग मनात घेऊन संतप्त युवकाने दुसऱ्या युवकाला चाकूने भोकसले.
सविस्तर वृत्त असे की, ढानकी येथील आरोपी नामे पवन सुभाष बाभुळकर आणि प्रवीण लिंबाजी माने यांच्यामध्ये काल सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक येथे शाब्दिक वाद झाला. उपस्थित नागरिकांनी दोघांमधील भांडण मिटवले आणि दोघांना आपापल्या घरी पाठवले. मात्र पवन याच्या मनामध्ये प्रवीण माने यांच्या बद्दल राग होता. सायंकाळी प्रवीण आपल्या घरी जेवण करून घरी बसला असताना आरोपी पवन हा घरात आला आणि त्याची कॉलर धरून तू माझ्या बहिणी बद्दल अपशब्द का बोललास या कारणाने जीवे मारण्याच्या हेतूने लोखंडी चाकू काढून पाठीवर वार केले. यात प्रवीण हा गंभीर जखमी झाला. पुन्हा जर अपशब्द बोललास तर जिवे मारून टाकील अशी सुद्धा धमकी पवन याने प्रवीण याला दिली. जखमी प्रवीण यास तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. आरोपी विरोधात पोलीस स्टेशनला आज दिनांक 18 जानेवारी रोजी फिर्यादी देण्यात आली आहे. अप नंबर 08/2025 कलम 109(1) 333भा. न्या.स नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टीपुर्णे, जमदार रोशन सरनाईक करत आहेत.