
प्रतिनिधी :प्रवीण जोशी
ज्ञानज्योती शाळेच्या रंजना लाखने व ज्योत्स्ना आजेगावकर बाईंचा नुकताच शाळेतर्फे उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सन्मान करण्यात आला. निमित्य होते ज्ञानज्योती शाळेचा रोप्य महोत्सव पार पडला यावेळी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद होता तो क्षण त्यांच्यासाठी एवढा अस्मरणीय होता की विश्वातील कोणत्याही वजन मापकावर त्याचे माप होणे अशक्य होते.
ज्या विद्यार्थ्याला शिकवताना अ..आईचा ऊ.. ऊसाचा पासून एक__दोन ते ज्या पाड्याशिवाय गणित सुटू शकत नाहीत असे बे एक बे पासून ए फॉर एप्पल बी फॉर बॉल असे शिकवलेले तेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरीत्या भरारी व स्थिर स्थावर होऊन समाजामध्ये वावरत असताना एक यशस्वी नागरिक व आपली देशाप्रती, कुटुंबाला व समाजासाठी प्रत्येक ठिकाणी यशस्वीपणे काम करत असताना त्यांच्या हातून हा सन्मान मिळणे म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. शिक्षिका विद्यार्थ्याला घडवित असताना आपल्या कुटुंबातील एक अस समजून विद्यार्थ्यांना विद्यादान दिले म्हणूनच आज अनेक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहेत.
जगात जीवन जगत असताना आपल्याला काय दयायचे तो देण्याचा धर्म कोणता तर आपल्या आजूबाजूला जे कोणी दुखी पिडीत दिन दुबळे असतात अशांना जाऊन मदत करणे अशी प्रेरणादायी मदतीचा भाव अर्पण करण्याची वृत्ती संस्कारित करून ते बिंबवले असे विद्यार्थ्यांना शिकविले बाईंनी, केलेल्या संस्कारामुळेच ते विद्यार्थी आज वैद्यकीय शास्त्रामध्ये पारंगत होऊन एमबीबीएस, डीएचएमएस, तर कोणी अभियंता, शिक्षक, शिक्षिका म्हणून नावारूपास आले.
समाजाला देशाला येणाऱ्या काळात शाळेत बागडणाऱ्या लहान चिमुकल्यांना संस्कार होणे गरजेचे असते. यांनाच भविष्यात देशाला आणि समाजाला आकार दयायचा असतो यातून कोणी डॉक्टर होऊन सेवा करू शकतो तर कोणी अभियंता होऊन देशाला विविध रस्ते बांधणीसाठी ही मंडळी येणाऱ्या युगाला आकार देण्याचा काम करतील म्हणूनच विविध क्षेत्रात भरारी घेऊन सुद्धा या ज्ञानमंदिराला योग्य शिक्षण देणाऱ्या गुरुजनांसमोर नतमस्तक होतात. सत्यम शिवम सुंदरा अशी शिकवण मिळते. इथूनच शब्दरूपाने बळ मिळते भावरूपाने काम करण्याची वृत्ती जन्माला येते. स्वतःची प्रगती साधण्यासाठी बळ लाभते. कृती या चिमुकल्यांना इथेच मिळते आणि विद्याधन देण्यास ध्यास व एकच छंद या दोन्ही बाईंनी विद्यार्थ्यांना दिला म्हणून मुले नितीमत्ता कला गुण व बुद्धिवंत झाले. त्यांच्या कीर्तीचा कळस ठामपणे उभा आहे ते दिलेल्या संस्कारामुळे व ज्ञानामुळे.
