
सहसंपादक : रामभाऊ भोयर
चार दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तालुक्यातील शेती कामांना वेग आला असून शेतकऱ्यांनी पिकाला खत युरिया देण्याची लगबग सुरू केली आहे. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे खत युरिया उपलब्ध आहे त्यांनी पिकाला देणे सुरुवात केली परंतु ज्या शेतकऱ्यांकडे खत युरिया नाही असे शेतकरी कृषी केंद्रात खत युरिया खरेदी करिता जात आहे परंतु शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने शेतकरी कृषी केंद्रात चकरा मारताना दिसत आहे ऐन वेळेवर शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे संबधित कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून तात्काळ युरिया उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे सुरुवातीलाच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असताना शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यानंतरही खुरपणीला आलेल्या पिकांना आता खत युरियाची मात्रा देण्याची वेळ आली असून खते युरिया खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना ऐन वेळेवर पाहिजे ते खत युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आणखीच चिंता वाढली आहे तेव्हा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना युरिया मिळत नसेल अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा जे शेतकरी कार्यालयाशी संपर्क साधतील अशा शेतकऱ्यांना आम्ही कृषीकेंद्रातून युरिया उपलब्ध करून देवू
तालुका कृषी अधिकारी (प्रभारी)
सुहास बेंडे
