
संग्रहित फोटो
प्रतिनिधी: प्रवीण जोशी ,ढाणकी
बिटरगाव वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या जंगलांमध्ये अवैध वृक्षतोड प्रचंड प्रमाणात वाढ झाली असू संबंधित वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे . पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लाकडाचे सुवर्णकाम करणाऱ्याचे काम थांबले होते पावसाने उसंत घेतल्या कारणाने पुन्हा वनविभागाच्या आशीर्वादाने सगळे आलबेल असून वृक्षतोड होत असल्याचे चित्र आहे.किती ही बातम्या टाका आमचे काहीही होऊ शकत नाही ही प्रवृती वाढलेली दिसते.
.
कृष्णापुर टेंभुरदरा नींग नूर मुरली सोंनदाभी येथील टेकड्या तर अगदी उजाड झाले असून कुंपणच शेत खाते की काय ?अशी जनचर्चा आहे एकेकाळी घनदाट जंगल होते पण वर्तमान परिस्थिती पाहता जंगल अत्यंत विरळ होत चालल्याचे वास्तववादी चित्र आहे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित व कुचकामी धोरणामुळे लाकूडतोड्यांचा सुवर्णकाळ आल्याचे बोलले जात आहे बिटरगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत असलेल्या गावात सागवानासह लिंब चिंच धावंडा अशा अनेक मौल्यवान झाडाची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वनरक्षक यांच्या आशीर्वादाने सदरचा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे वन्यप्रेमीतून उघडपणे बोलले जात आहे अवैध वृक्षतोड जोमात आणि वनविभाग मात्र कोमात अशीच परिस्थिती दिसून येत आहे गैरी लाकूड घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला ठराविक रक्कम लावण्यात आल्याचेही स्फोटक चर्चा जनतेतून उघडपणे बोलल्या जात आहे वृक्ष संवर्धनासाठी शासनाकडून दरवर्षी प्रचंड गाजावाजा करून वृक्ष लागवड केली जाते तर वृक्ष संवर्धनावर देखील कोट्यावधीचा खर्च करण्यात येतो. मात्र वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे उपाययोजना केली जात नाही हे न उलगडणारे कोडे आहे त्याची संपूर्णपणे संबंधित विभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी निसर्गप्रेमी बांधव करत आहेत.
