
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
महाराष्ट्र सरकारने शेतकरी मिशनची पुनर्रचना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केली असुन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने शेतकरी मिशनला विषेय बाब म्हणून निवडणूक आदर्श आचारसंहीते पासुन दौरे करण्यास व आढावा घेण्यास परवानगी दिली आहे तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आत्महत्याग्रस्त भागातील महसुल ,ग्रामविकास ,वीज,सार्वचनिक बांधकाम ,आरोग्य ,कृषी ,आदिवासी विकास ,पोलीस विभागाच्या समस्यांची विषेय माहीती देण्यासाठी हा दौरा आयोजीत करण्यात आला आहे तो खालील प्रमाणे आहे .
दुपारी १ वाजता कारेगाव (रामपूर )तालुका केळापुर जिल्हा यवतमाळ येथील आदिवासी शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील महसुल ,ग्रामविकास ,वीज,सार्वचनिक बांधकाम ,आरोग्य ,कृषी ,पीककर्ज वाटप ,आदिवासी विकास ,पोलीस विभागाच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी “सरकार आपल्या दारी कार्यक्रम
दुपारी ३ वाजता सेंट्रल बँक मोहदा येथे पीककर्ज वाटपाच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रकरणावर भेट
संध्याकाळी ४ वाजता वरुड जहांगीर तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील आदीवासी शेतकरी आत्महत्याग्रस्त अंगद आडे यांच्या कुटुंबाला भेट
या भेटी दरम्यान जिल्हास्तरीय महसुल ,ग्रामविकास ,वीज,सार्वचनिक बांधकाम ,आरोग्य ,कृषी ,आदिवासी विकास ,पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित राहणे गरजेचे आहे.