अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती चे राळेगाव तालूकाध्यक्ष पदी प्रबोधनकार गंगाधरराव घोटेकर ह्यांची नियूक्ती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीचे कार्याला शहर व ग्रामीण भागातील तळागाळातील गाव खेडे,तांडे वाड्यातील गोरगरीब भजन गायक,किर्तनकार,प्रबोधनकार साहित्यीक,कवी,कलापथके शाहीर ,नाट्य कलावंतांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,जिवाभावाने व सदभावनेतून कार्य करणारी वारकरी कलावंत व ,प्रबोधनकार मंडळी समितीला मोठ्या प्रमाणात जूळत आहेत.समितीतर्फे प्रत्येक कला प्रवर्गातील कलावंतांच्या मूलभूत गरजा,न्याय मागण्या , प्रश्न तथा त्यांची अस्मिता जोपासण्यासाठी निदर्शने, निवेदने,ऊपोषणे,ई आंदोलनाद्वारे शासनाकडून न्याय मिळेस्तोवर प्रचंड ताकदीने संघर्ष ,व पाठपूरावा केल्या जात आहे. तालूका व गावपातळीवर समिती चे कार्य अधिक गतिमान व कार्यक्षम करण्यासाठी सक्षम तालूकाध्यक्षांची नियूक्त करण्यात येत आहे.
मा.श्री.गंगाधरराव घोटेकर हे उत्कृष्ट प्रबोधनकार आहेत,तसेच अ.भा.गूरूदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक म्हणूनही कार्यरत आहेत व विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे .त्यांचा तालूक्यातील समस्त कलावंतासोबत दांडगा संपर्क आहे.त्यांची अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सोमनाथ दादा गायकवाड ह्यांचे आदेशाने व राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांचे मार्गदर्शना खाली राळेगाव तालूकाध्यक्षपदी नियूक्ती करण्यात आली आहे.त्याच्या नियूक्तीने तालूक्यातील समस्त कला प्रवर्गातील कलावंतांना न्याय व दिलासा मिळेल असा विश्वास विदर्भ प्रदेश अध्यक्ष मनोहरराव शहारे,विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थजी भवरे,जिल्हाध्यक्ष अविनाशजी बनसोड,जिल्हा महासचीव रमेशजी वाघमारे ह्यांनी व्यक्त केला आहे.