कापूस कोंडया ची गोष्ट सांगणाऱ्या काचूरीवर पुरस्काराचा वर्षाव
( राळेगाव तालुक्यातील कलाकार, राळेगाव येथेच झाले चित्रीकरण )

सहसंपादक: रामभाऊ भोयर

    

बड्या न्यूज चॅनल मध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून व्यवस्थित कामं सुरु असतांना त्याने तॊ जॉब सोडला.त्यानंतर सुरु केली भटकंती, सायकल वरून पूर्ण जिल्हा फिरून घेतला. माणसं वाचतं गेला, जोडत गेला. प्रश्न|च्या खूप नजदिक गेल्याने उत्तराची गरज जी त्याला जाणवली त्यातून बहुदा काचोरीच्या टोचणीची सल उसवत गेली असणार. शेतकऱ्याच्या उध्वस्त वर्तमानातील वस्तुस्थिती, या वेदनेतून जन्मास आली एक उत्तम कलाकृती तीच नाव काचोरी.गोवा इंटरनॅशनल फिल्म कॉम्पेनंसेशन, बेस्ट सोशल ड्रामा हे मानाचे पुरस्कार या कलाकृतीने पटकावले.हे शिवधनुष्य लीलया पेललेल्या या अवलियाचे नाव आहे कपिल श्यामकुवळ.जो या चित्रपटाचा निर्माता आहे. विशेष म्हणजे यातील सारेच्या सारे कलाकार यवतमाळ च्या मातीतील आहेत.
काचोरी या चित्रपटाला तीन मानाचे पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली आणि राळेगाव तालुक्यात आनंदाला उधान आले. काल दिवसभर सोशल मीडियावर काचोरीचीच धूम होती.त्याला कारणही तसेच होते, यातील बहुतांश कलाकार राळेगाव तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे तुमच्या आमच्यातील आहेत. ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नसेल त्यांच्यातील सुप्त गुणांना यामुळे वाव मिळाला. यातील युवा शेतकऱ्याची मुख्य भूमिका निभावली ती कपिल श्यामकुंवर यांनी. राळेगाव तालुक्यातील गुड्डू मेहता, जितेंद्र कहूरके, अंकुश मुनेश्वर, स्वप्नील वटाणे, दुर्गेश गुरणुले मयूर वटणे आदीनी यात दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला. या चित्रपटाचे चित्रीकरण तालुक्यातील शेळी, धानोरा, राळेगाव परिसरात झाले.
तालुक्यात यातील कलाकार व निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत काचोरी चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले . सर्वांनी या कलाकृतीचे कौतुक केले. अंत्यत कमी संसाधनामध्ये, स्थानिकांच्या सहकार्याने चित्रपटासारखा विषय हाताळण्यात आला.तीन मानाचे पुरस्कार काचोळीच्या वाट्याला आल्याने तॊ यशस्वी झाल्याची मोहर त्यावर उमटली.


कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा हे कथासूत्र
कापूस निघाल्यावर फांदीवर उरते ती काचोरी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या हाती देखील खर्च वजा जाता ही काचोरी व तिची टोचणी उरते असा आशय घेउन ही काचोरी आपल्यासमोर येते. यातील युवा शेतकरी हा अल्पभुदारक आहे. तॊ शिक्षित आहे. त्याला दोन मुली आहेत वंशाचा दिवा मुलगाच हवा या विचाराचा तॊ नाही. अर्थात तॊ प्रागतिक विचारसरणीचा आहे. त्याच्या पत्नीची भक्कम साथ त्याला आहे.मात्र उत्पादन खर्च व कर्ज याचा ताळमेळ लागत नाही. त्यातून तॊ अनेक घटनाना सामोरा जातो. याचा शेवट हा या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्तेत होतो की काय असे वाटतं राहते मात्र तोच क्लायमेक्स आशादाई दाखवला आहे.