
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येते ४ एप्रिल रोजी सायंकाळी अनिकेतच्या कुटुंबाला राळेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी सात्वन भेट दिली सात्वन भेटी दरम्यान. चित्तरंजन कोल्हे तालुक अध्यक्ष ( बिजेपी ), कुणाल भोयर राळेगाव शहर अध्यक्ष, विनोद मांडवकर, विवेक दैलतकार, हरीश काळे, पंढरीनाथ करपते व निडगुरवार परिवार उपस्थित होता.१ एप्रिल रोजी माजीमंत्री वसुधा देशमुख बडनेरा यांच्या कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेला अनिकेत अशोक निडगुरवार यांना शिक्षकांनी कॉलेजच्या फी भरण्यासाठी तगादा लावण्याने अनिकेत गळफास लावून आत्महत्या केली आहे.सदर सात्वन भेटी दरम्यान राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी असे मटले की सदर १ एप्रिल रोजी घडलेली घटना ही निंदनीय आहे. मी याबाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधित वसुधा देशमुख कॉलेज येथील संस्थाचालक व शिक्षकावर कारवाई करु व अनिकेतच्या कुटुंबाला न्याय मिळवून देवू असे आश्वासन आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिले.
