
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एकाच दिवसांमध्ये कापसाच्या भावात 300 रुपयाची तेजी आल्याने ज्या शेतकऱ्याकडे कापूस आहे अशा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण ही तेजी औटघटकेची ठरली दुसऱ्या दिवशी कापसाचे भाव हे काही रुपयाने उतरले अनेक दिवसापासून कापसाच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहेत हे दर वाढण्याऐवजी उतरतच होते मध्यंतरी हमीभावाच्या खाली सुद्धा कापसाचे दर गेले होते अलीकडच्या काळात कापसाचे दर 7 000 रुपयाच्या दरम्यान होते मंगळवारी कापसाचे सर्वोच्च दर हे 7300 पर्यंत होते हेच दर बुधवारी 7670 पर्यंत गेले एका दिवसात कापसाच्या भावात तीनशे रुपयाची तेजी आली त्यामुळे निश्चितच ज्या शेतकऱ्याकडे कापूस आहे त्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता सरकी तसेच कापसाच्या गठाणीत तेजी आल्याने कापसाचे भाव वाढल्याचे जाणकार म्हणतात पण गठाणीच्या दरात थोडीशी कमी आल्याने गुरुवारी कापसाचे दर हे उतरले गुरुवारी कापसाचे दर हे 7500 रुपया दरम्यान होते राळेगाव बाजार समितीचा विचार केल्यास बाजार समिती द्वारे सद्यस्थितीत दररोज दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी होत आहेत आजतागायत बाजार समितीने सात लाख 70 हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे कापसाचा भावामध्ये अलीकडच्या काळात अशाच प्रकारची तेजी राहील असे संकेत या क्षेत्रातील जाणकार देत आहेत
