राळेगाव गटशिक्षणाधिकारी पदी चंद्रभान शेळके

सहसंपादक : रामभाऊ भोयर


राळेगाव प. स. अंतर्गत गट शिक्षणाधिकारी म्हणून चंद्रभान शेळके हे नुकतेच रुजू झाले. नियत वयोमानानुरूप देवतळे मॅडम या सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी चंद्रभान शेळके यांची नेमणूक झाली.
शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व आता गट शिक्षणाधिकारी असा चढता आलेख त्यांचा सेवे बाबत राहिला आहे. सर्वांशी सलोखा, शिस्त, नियमानुसार कामं करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षक हा केवळ गुरुस्थानीच नाही विद्यार्थ्यांसाठी तॊ देवस्थानी असतो. मात्र विद्यार्थी हे देखील शिक्षकासाठी दैवत आहे. त्यांना योग्य शिकवण दया. अध्ययन, अध्यापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे सर्वांनी यात मनापासून चांगले कामं करावे आणि शिक्षक ते करतील अशी खात्री आहे असा आशावाद त्यांनी निवडी नंतर व्यक्त केला.