नितीन भुतडा यांच्या मागणीला यश ; एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला मिळाली मुदतवाढ


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड



एमबीबीएस प्रवेश प्रक्रिये करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही.विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी
एमबीबीएस ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदत वाढ देण्याची मागणी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका पत्राद्वारे निवेदन केले होते त्याची दखल घेत एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.