राज्यात M. P.S.C मध्ये तिसरी आलेली दर्शना पवार तरुणीचा प्रेम, प्रकरण, हत्याकांडमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव

एमपीएससी मध्ये उत्कृष्ट मार्क घेऊन राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार या तरुणीचा खून राहुल हंडोरे या तरुणाने केल्याचे निष्पन्न झाले आहे .या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला .वास्तविक हे कृत्ये अतिशय वाईट आहे. पण हे दोघंही तरुण वयात सोबत राहतात – खातात – पितात – मोटार सायकलवर फिरतात -अभ्यास एकत्र करतात – एकमेकांच्या सुखा दुःखात सामील होतात म्हणजे ह्या दोघांमध्ये अतिशय घनिष्ठ असे जिव्हाळ्याचे संबंध होते . हे संबंध त्यांच्या घरच्यांना व सोबत अभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्याना सुद्धा माहीत होते . जेव्हा एका तरुण मुलाची एका तरुण मुलीशी मैत्री असते तेव्हा ती मैत्री अनेक सीमा पार करत असते किंबहुना पुण्यात अनेक तरुण तरुणी एमपीएससी व यूपीएससीच्या अभ्यासाच्या नावाखाली लिव इन रिलेशनशिप मध्ये असताना,
यातून एमपीएससी परीक्षेत दर्शनास यश मिळाले व राहुल हंडोरे यांनी मी एका वर्षात पोस्ट काढून दाखवतो. तू माझ्याशी लग्न कर! हे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे परंतु जेव्हा दर्शनाने लग्नास नकार दिला तेव्हा मात्र त्याचा विश्वास भंग झाला आणि त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले .त्यावेळची त्याची मानसिकता स्वतःला समजून घेण्याची नव्हती व त्यात त्या दोघाचे लग्नावरून भांडण झाले व त्याने पुण्याहून राजगड च्या पायथ्याशी नेऊन दगडाने ठेचून व धार- धार शस्त्राने प्रहार करून त्याची हत्या केली तो अनेक राज्यात भटकत होता तेव्हा मुंबईत पोलिसांनी आरोपीस पकडले व बेड्या ठोकल्या.
यामध्ये तरुण-तरुणी कोणताही बोध घेत नाहीत .आज प्रेम करून धोका देण्यापेक्षा ते न केलेलं बरं ! प्रेम करून धोका दिला तर ज्याला धोका बसतो तो बदलेची भावना ठेवतो,त्यामुळे तो कोणत्याही परिणामाची परवा न करता असे कृत्य करतो.आज हेच प्रकरण महाराष्ट्रात सोशल मीडियावर सध्याचं गाजतयं समाजाला सुधारण्याची जिम्मेदारी सर्व भारतीयांची आहे. राहुल हांडोऱ्यावर भारतीय संविधाना प्रमाणे कारवाई व्हायची ती होईल पण दर्शना पवारचा गेलेला जीव मात्र वापस येणार नाही .माझी कळत न कळत सर्व तरुण-तरुणीला विनंती प्रेमाचा वेड मनाला लावून घेऊ नका एकदा का प्रेम झाले की जिंदगीभर पश्चाताप सोडत नाही आणि मग कोणाला प्रेम मिळते कोणाचे तुटते आणि कोणाच्या नशिबी अशा अप्रिय घटना येतात. अशा कृतीच समर्थन कधीच नाही पण भावनेशी खेळ केव्हा नफरत मध्ये बदलेल सांगता येत नाही
.