
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी..
सर्वत्र निवडणुकीची गडबड सुरू असताना शहरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते सध्या मोठ्या प्रमाणात व्यक्ती भौतिक सुखात रममान झाला असताना सकारार्थी विचाराच्या निर्मितीची गरज असते ते विचार अशा कार्यक्रम आयोजनातून सर्वसामान्य पर्यंत पोहोचते आणि आध्यात्मिक व भाविक मंडळी यापासून दूर राहू शकत नाही लहानग्यांना दूरचित्रवाणी व तरूणांना व्हॉटसअप आणि इतर मोबाईलच्या सुविधेमधे अगदी सहजपणे दिवस निघून जातात पण वृध्द मंडळींना यांच्याशी काहीही घेणे देणे नसते ते फक्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कुठे आहे याच्याच शोधात असतात .
ढाणकी शहरात श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन ९/४/२०२४ ते १७/४/२०२४ एप्रिल दरम्यान ढाणकी येथील स्वामी विवेकानंद वसतिगृहात करण्यात आले होते.त्याची सांगता दिनांक १७ एप्रिल रोजी विवेकानंद वसतिगृहात अत्यंत भक्तीयुक्त वातावरणात भागवत कथाकार राजेंद्र महाराज गुंजकर यांचे सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने झाली .यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते भागवत कीर्तनात महाराजांनी काल्याचे महत्त्व सर्वसामान्यांना यावेळी सांगितले दहीभाताचा काला, रामनामाचा काला, ब्रह्मज्ञानाचा काला, असे तीन प्रकार आहेत तीन देह त्याचे तीन रोग आहेत वात, कफ, पित्त, दुर्गंधी, हे स्थूल देहाचे रोग आहेत हे घालविण्याकरता वैद्यकशास्त्राच्या आधारे दहिभात काला खाऊन शरीर पुष्ट होते. व त्यातून सुख मिळते. सूक्ष्म व त्याचा रोग,काम, क्रोध, लोभ, मोहा, दंभ, वासना, इच्छा अहंकार असून ते रामाच्या काल्याने नाहीसे होतात तिसरा देह कारण त्याचा रोग अज्ञान आहे व त्याचा निवृत्तीचा उपाय म्हणून ब्रह्मज्ञानाचा काला सांगितला आहे. मानवी देहात हाच काला मिळाला पाहिजे असे म्हटले आहे याने कसलाच भेदभाव राहत नाही हा काला वैकुंठातही नाही कारण सर्व लोकात दोष आहेत असेही यावेळी महाराजांनी काल्याच्या कीर्तनात स्पष्ट केले. पुढे बोलताना महाराज म्हणाले की तो काला आम्ही कुठे खाणार तर निष्काम कर्म करून फळाचा मदन करिता काला करणार यालाच वाळवंट म्हटले आहे. त्याचवेळी अभेद्य अवस्था मिळते व पुन्हा जन्माला येऊन हा आनंद लुटू असेही यावेळी महाराज म्हणाले व मानव जन्म हा अमूल्य असून जास्तीत जास्त वेळ हा सत्कर्मात घालून परमेश्वराच्या भक्तीत घालावा तरच मोक्ष प्राप्ती होईल असे विविध दाखले देत उपस्थित असलेल्या भाविकांना सांगितले भागवत कथे दरम्यान विविध कार्यक्रम घेऊन ढाणकीकराना ईश्वराच्या नाम स्मरणाची महत्ती महाराजानी विषद केली त्यांना लक्ष्मीकांत महाराज यांनी हार्मोनियम वर साथ दिली व तबला वादक म्हणून श्रीकृष्ण टाले यांनी तेवढीच मधुर संगीत साथ दिली आणि सिंथ वादक म्हणून अभिषेक टाले यांनी मोलाची कामगिरी बजावली.
या कार्यक्रमामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले ,शुभ चींतावे, शुभ इच्छावें, वचनी शुभ, बोलावे सत्कर्माच्या पुण्याईने मानव जन्माचे सार्थक करावे साधू संत येती घरा तो ची दिवाळी दसरा अशा स्वरूपाचा प्रत्यय आला भागवत कथा ऐकून रिफ्रेश झाल्यासारखे वाटले. वातावरण प्रसन्न झाले .
सुरेश नारायणलालजी जयस्वाल
नगराध्यक्ष ढाणकी