मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्यात. भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मिल्ट्री जवान, शेतकरी, पंडीत चाचा नेहरू इत्यादी वेशभूषा सादर करण्यात आल्या. मुलींनी पारंपारिक पद्धतीने नववारी नेसून अमृत कलशामध्ये गावकऱ्यांकडून माती जमा करण्यात आली. गावातील प्रतिष्ठित मंडळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सुरकर उपाध्यक्ष अतुल बेडदेवार, सरपंचा बबिताताई अक्कलवार, उपसरपंच विशाल आत्राम, ग्रामसेवक मनोज पन्नासे, अंगणवाडी सेविका, आशावर्कर व आरोग्य सेविका यांनी सहभाग घेतला. गावातून वाजत गाजत प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे, मंगला आगरकर, रेखा कोवे, अर्चना सुरजुसे यांनी रॅली सजावटीसाठी आकर्षक असे कलश तयार केले.
पंचायत समिती राळेगावचे गटविकास अधिकारी केशव पवार साहेब, गटशिक्षणाधिकारी सरलाताई देवतळे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रभान शेळके, मस्के साहेब यांनी यथोचित मार्गदर्शन केले.