
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार दिं.२० एप्रिल २०२५ रोज रविवारला ४:०० च्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील मंगी फाट्या समोर घडली
या अपघात मृत्य पावलेली संतोषी किसन तोडसाम वय ५० वर्षे राहणार पळसकुंड या महिलेचे नावं असून तर आता पती किसन तोडसाम वय ५५ वर्ष तसेच मुलगा जय तोडसाम वय २८ वर्ष रा पळसकुंड असे अपघातातील जखमी चे नावं आहे. आहे हा अपघात इतका भीषण होता की महिलेचा डोक्याचा पूर्ण भाग एक धडापासून वेगळा झाला होता याप्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की किसन तोडसाम व संतोषी तोडसाम तर मुलगा जय तोडसाम हे तिघेही आपल्या मोटर सायकल क्रमांक एम एच २९ सी ई ३५७६ ने एकुर्ली येथे बळवंत नेहारे यांच्या मुलीच्या लग्नसमारंभाकरिता बोरी इचोड येथील उरकुडे मंगल कार्यालयात आले होते दुपारी लग्न समारंभ आटोपून ते आपल्या मोटर सायकल ने पळसकुंड येथे गावी जात होते दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक ४४ या महामार्गाने जात असताना मंगी फाट्यासमोर समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने तोडसाम यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडके संतोषी तोडसाम यांच्या डोक्याचा पूर्ण भाग धडापासून वेगळा झाला त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर पती किसन तोडसाम व मुलगा जय तोडसाम यांच्या पायाला गंभीर मार लागल्याने दोघेही अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यामुळे तोडसाम यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देवून अज्ञात वाहनाने तिथून पळ काढला असून घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस वेळीच दाखल झाले असून अपघातात जखमीला पुढील उपचारात करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.
