लखाजी महाराज व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 6/12/2022 रोज मंगळवारला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड व प्रमुख पाहुणे सहायक शिक्षक रमेश टेभेंकर यांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.या नंतर ज्या वर्गाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.असे वर्ग अकरावी कडून उपस्थित पाहूण्याचा स्वागत समारंभ संपन्न झाला.स्वागत समारंभ संपन्न झाल्यानंतर वर्ग 11 वी चे वर्गशिक्षक,ज्यांनी अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला असे वर्गशिक्षक रंजय चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. यानंतर विद्यार्थी वक्ते यांनी महामानवाच्या जिवनावर आधारित गीत सादर केले.काही विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल सखोल माहिती सांगितली. असे विद्यार्थी वक्तेअक्षता येरेकार आचल उरकुडकर दिव्या वाकुलकार पल्लवी राजूरकर कोमल खंडाळकर दिव्या वैद्य अश्विनी पारिसे साक्षी ठाकरे कल्याणी वकील भुषण पारिसे मिनाक्षी लोखंडे यांचे मनोगत आटोपल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ शिक्षक रमेश टेभेंकर यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग अकरावीची विद्यार्थींनी पल्लवी देशमुख हिने केले.तर आभारप्रदर्शन कोमल खंडाळकर हिने केले.त्यावेळी या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक श्रावनसिंग वडते दिगांबर बातुलवार सौ.कुंदा काळे सौ वंदना वाढोणकर राजेश भोयर स्वाती नैताम मोहन आत्राम मोहन बोरकर विशाल मस्के वैशाली सातारकर शुभम मेश्राम दिपाली कोल्हे अश्विनी तिजारे रूचिता रोहणकर वाल्मिक कोल्हे पवन गिरी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षक रंजय चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.