
सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचापाठिंबा का नाही?
सहसंपादक : रामभाऊ भोयर
डोंगरखरर्डा -जोडमोहा मधून जिल्हा परिषद निवडणुकीकरिता प्रहार जनशक्ती पक्ष उमेदवारासाठी शिवपुरी-पहूर-डोंगरखरर्डा- जोडमोहा परिसरातून येथून दोन लाख रुपये वर्गणी देण्याचे स्थानिकांनी आश्वासन दिले.
येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागणार असून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख दिलीप डवरे यांची काम करण्याची पद्धत बघून, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी अहोरात्र तयार राहण्याचे त्यांचे कार्य बघून जोडमोहा-डोंगरखरर्डा सर्कल मधून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जोडमोहा-डोंगरखरर्डा येथील लोकांनी गावातून हजार पाचशे दोन हजार रुपये वर्गणी करून एकूण दोन लाख रुपये त्यांना निवडणुकीकरिता
देण्याचे जाहीर केलेले आहे, आजचा काळ बघता आपण पाहतो श्रीमंत व्यक्तीच निवडून येतो, तो पैसा वाटतो त्याचं नाव आहे या संकल्पनेला गाव खेड्यातून हद्दपार केलेले आहे, ही आजची जनता ही पैशाला किंमत न देता माणसाच्या स्थानिक व कर्तुत्वाला किंमत देत आहे हे या मदतीतून आपल्याला दिसत आहे, साधा स्वभाव, आक्रमक व्यक्तिमत्व, गरिबांसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांशी झगडण्याची वृत्ती व जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे तथा गरीब दीनदुबळे वंचित सर्व समाजातील जाती धर्मातील लोकांना आपलेसे समजून त्यांच्यासोबत जिव्हाळा निर्माण करणारे “बाजीराव” हे एकमेव व्यक्तिमत्व गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये प्रचलित झालेले आहे आणि येत्या काही दिवसात होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याकरिता मतदार संघातील संपूर्ण लोकांनी मतदारांनी कंबर कसून त्यांच्यासाठी लोकवर्गणी करून गावोगावातून वर्गणी करायला सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच ज्यावेळेस समाज एखाद्या कार्यकर्त्याबद्दल जिव्हाळा निर्माण करतो तर त्याला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अशी भावना संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेले आहे आणि यामुळे जिल्हा परिषद जोडमोहा-डोंगरखरडा सर्कल मधून प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवार बाजीराव भीमा टेकाम (कोलम) ह्या निश्चितच निवडून येणार असा ठाम विश्वास जनतेने दिलेला आहे.मतदारांनी विचार करण्याची गरज! निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे, तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात!आजच्या राजकारणात समाजसेवा आणि जनतेची कामे मागे पडून पैशांचा प्रभाव वाढला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते आपले आयुष्य लोकसेवेत घालवतात, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांचा पाठिंबा मात्र त्यांना मिळत नाही. कारण एकच — त्यांच्याकडे पैसा नसतो!आज मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर पैशाच्या मोहात अडकलेला आहे. हजार-दोन हजार रुपयांमध्ये मत विकले जाते आणि मग पाच वर्षे त्याच लोकप्रतिनिधींनी फसवले जाते. हीच वेळ आहे जागे होण्याची! कारण अशा खरेदी-विक्रीतून लोकशाही नव्हे, तर ‘व्यापारशाही’ तयार होते.निवडणूक म्हणजे सेवा नव्हे, तर गुंतवणूक बनली आहे. पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे, तर स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करतात. ते खर्च केलेल्या पैशांचा परतावा मिळवण्यासाठीच पुढील पाच वर्षे जनतेवर राज्य करतात.
