येवती ते पार्डी रस्त्यावर भगदाड
अपघातांची शक्यता


सहसंपादक : रामभाऊ भोयर

नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या येवती ते पार्डी या रस्त्यावर भगदाड पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून रस्त्याच्या कामाचा दर्जा या भागदाडाने चव्हाट्यावर आणला आहे.
राळेगाव तालुक्यातील येवती पारडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने रोडच्या मध्यभागी प्रचंड असे भगदाड पडले असल्याने हे भगदाड ये- जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण. देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत या रोडचे काम चार महिन्या आधी पूर्ण झाले आहे.या रस्त्याच्या साईडने मुरूम भरण्याच्या ऐवजी मातीचा वापर केला असल्याची ओरड या परिसरातील नागरिकां कडून होत आहे.माती मिश्रित काम केल्याने दर्जा खालवला आहे.त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे येथील उपस्थित नागरिकांन कडून बोलल्या जात आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी संबंधित ठेकेदार व बांधकाम अभियंता यांना काम करतेवेळी काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती दिली होती परंतु याबाबत आमच्या बोलण्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे येथील उपस्थिती नागरिकांकडून सांगितल्या जात आहे. तर याच रोडला क्रॉस करून बेंबळा कालव्याचे सुद्धा काम सुरू आहे हेही काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड येथील नागरिकाकडून होताना दिसत आहे सदर संपूर्ण कामाची मोक्का पाहणी करून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होताना दिसत आहे