
सहसंपादक: रामभाऊ भोयर
अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीचे कार्य जिल्ह्यातील गाव खेडे,तांडे वाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोळाही तालूक्याचे तालूकाध्यक्ष,त्यांचे अधिनस्त वारकरी कलावंत आघाडी,महीला कलावंतआघाडी,यूवा कलावंत आघाडी जोमाने कार्य करीत आहे, ह्या सर्व पदाधिका-यांना योग्य मार्गदर्शन,व दिशा देवून त्यांचे कार्य गतिमान करण्यासाठी समितीच्या कार्याला पूर्ण वेळ समर्पित करून संगठण बांधणीच्या कार्याला झोकून देणारे, आदरणीय गंगाधर दादा घोटेकर ह्यांची नियूक्ती यवतमाळ जिल्हा कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हा समन्वयक पदी करण्यात आली, समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे , विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ भवरे ह्यांचे हस्ते त्यांना नियूक्ती आदेश प्रदान करण्यात आला. शासकीय विश्रामभवन मधे संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमात मा.ऊत्तमराव बावणे ह्यांची जिल्हा सहसचीव पदी नेमणूक करण्यात आली,तद्वतच मा.मोहनराव खडसे ह्यांची बाभूळगाव तालूकाध्यक्ष, मा.प्रकाश दाभाडकर दिग्रस तालूकाध्यक्ष,दिनेश धारपवार नेर तालूकाध्यक्ष, मा.पांडूरंगजी एकनार यवतमाळ तालूकाध्यक्ष,आणि मा.पांडूरंगजी गजाई यवतमाळ तालूका कार्याध्यक्ष पदी नियूक्ती करण्यात आली.ह्या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष राजेश मडावी,ऊपाध्यक्ष गूणवंतरावजी लडके,महासचीव रमेशजी वाघमारे,जिल्हा संघटक अशोकराव ऊम्रतकर,सूधीर चौधरी,बाबारावजी राऊत,डाॅ.संदिप सूरकर ई.पदाधिकारी ऊपस्थित होते. नवनियूक्त तालूकाध्यक्षांनी तालूका कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषदा व मेळावे घेवून गोरगरीब कलावंतांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे , त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे असे आवाहन ॲड.श्याम खंडारे ह्यांनी केले.
