
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुका अध्यक्ष म्हणुन मागिल काही वर्षापासुन पक्षाची सेवा करण्याची संधी मला मिळाली परंतू आता वैयक्तिक कारणास्तव पुढे काम करणे शक्य नाही.पक्षाप्रती व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांप्रती कोणतीही नाराजी नाही.मी आज दि.16/08/2021रोजी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व राळेगांव तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे तो स्विकारावा असे ॲड फिडेल बाबासाहेब बायदाणी
राळेगांव जि. यवतमाळ यांनी आज राकाॅ जिल्हा अध्यक्ष दिलेल्या राजीनामा पत्रामध्ये नमूद केले आहे.
अंत्यत हुशार, प्रगल्भ व्यक्तीमत्व, उत्कृष्ट वक्ता म्हणून ॲड फिडेल बायदाणी जिल्ह्यात परिचित आहे हे विशेष.
