ढाणकी नगरपंचायत च्या विरोधात शिवसेनेचे लक्ष वेधी आंदोलन

प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढानकी

आज ढाणकी नगरपंचायत विरोधात शिवसेना युवासेना कडून शहरातील जागोजागी पडलेल्या खड्ड्यात बेशरम लावण्याचा उपक्रम करण्यात आला हे बेशरम लाऊन नगरपंचायत ला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला एकीकडे घरोघरी तिरंगा हा उपक्रम संपूर्ण भारतात राबविण्याचे आव्हान केंद्र सरकारने केले व आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पण गावागावात चांगले रस्ते पण नाहीत ही किती मोठी शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल यावेळी शिवसेना युवासेना कोर कमिटी अल्पसंख्यांक आघाडी शेतकरी शेतमजूर आघाडी महिला आघाडी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते