वडनेर येथील नाल्याच्या पुरामुळे नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात

सहसंपादक: रामभाऊ भोयर

वडनेर या गावात वॉर्ड नंबर ५ येथे संपूर्ण गावातुन येणारा पाणी या नाल्याला येथून निघत असताना तीन ते चार वर्ष पासून दरवर्षीप्रमाणे अतिवृष्टीमुळे नाल्याला पुरामुळे नागरिकांचे घरात येतात पाणी प्रत्येक वर्षी वडनेर ग्रामपंचायत यांना वारंवार नागरिक सांगत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष देत आहे आज वडनेर येथे वार्ड नंबर पाच नागरिकांनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे गुरुदयालसिंग जुनी नागरिकाकडून फोन द्वारे सुचित करून माहिती दिल्यास तात्काळ त्यांच्या बोलण्यानुसार तिथे जाऊन पाहिनी करण्यात आले तहसीलदार साहेब व गट विकास अधिकारी साहेब, वडनेर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी हरिदास जी रामटेके साहेब , या सर्व शासकीय अधिकारी साहेबांना विनंती करून या नागरिकांनी ची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी ही विनंती करण्यात आले
आज दिनांक ५ /८/२०२४ रोजी दहा ते बारा दिवसापासून सतत पावसाच्या कहर सुरू असल्यास आमच्या सर्व वस्ती येथे घरोघर पाणी छाती भर होत आहे आम्ही सर्व वडनेर रहिवासी आहोत वार्ड नंबर ५ चे नागरिक आहोत सर्वांचे घर नाल्याला लागून आहे जेव्हाही मोठा पाऊस पडतो या भागात चार ते पाच फूट पाणी वाहून निघते नाला व वडनेर गावातली एकमेव मोठी नाली सर्व गावातला पाणी त्यास नालीमारगे पाणी बाहेर गावातून निघते तो पाणी नागरिकांच्या घरा च्या आत घुसून अन्य धान्य वाहून जाते त्यांच्याकडे कितीदा माहिती व अर्ज केले आहे ही प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असतात त्यामुळे लोकांच्या घराचे नुकसान होत आहे गावातली सर्वात मोठी नाळी त्या भागात असल्यामुळे लोकांना जाण्यासाठी व येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे त्या नालीवर नागरिकांनी स्वतःच्या पैसायांनी ढोला घेतला तो पाण्याने खराब होऊन वाहून गेला ते सुद्धा ग्रामपंचायतला सांगून कोणी कर्मचारी येऊन बघत नाही वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार मा श्री गुरुदयालसिंग जुनी माजी ग्रामपंचायत सदस्य वडनेर यांनी येऊन परिस्थिती बघितली वडनेर ग्रामपंचायत वारंवार या लोकांवर अत्याचार व तुम्ही अतिक्रमावरील जागा वर राहत त्यासाठी आमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही असे टाळटाळ करत असेते आम्ही एकच अतिक्रम मध्ये बसून आहो का पूर्ण हिंगणघाट तहसील मधले खेड्यापाड्यात मध्ये कितीतरी लोक अतिक्रम करून बसून आहे त्यांच्या चुकीमुळे या नागरिकांचे नुकसान होत आहे यांनी वडनेर या गावात सरपंच पदावर असून यांच्याकडे दुर्लक्ष देण्यात आले वडनेर येथे ग्रामपंचायत प्रशासन सुरू असल्यास साहेबांना सचिव ग्राम विकास अधिकारी साहेब यांनी लक्षात घेऊन लवकरात लवकर वॉर्ड नंबर पाच येथे सर्व गोरगरीब हात मजुरी करणारे वर्ग असतात त्यांची परिस्थिती नवीन जमीन जागा घेण्याची नाही ग्रामपंचायत यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे व नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण करून नालीचे बांधकाम करून नालीचे पाणी सरल करण्यात यावी वार्ड नंबर पाच मध्ये नागरिकांच्या समाधान व लहान पूल काँग्रेटींग नालीवर बांधून द्यावी ही विनंती करण्यात आली उपस्थित
मा श्री गुरुदयालसिंग जुनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, मा श्री प्रशांत भाऊ दरोडे वर्धा जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस,मा श्री हरिदास जी गायधने,
प्रफुल जीवतोडे,चंदू जीवतोडे,आकाश परिसे, साहिल सिडाम, हर्षल परिसे ,सौ वर्षा खांगरले, सौ सविता शिवणकर, सौ संगीता परिसे, सौ सुनीता सोनवणे, सौ शेशीतला बागडे, सौ सीताबाई कुरसंगे, सौ सुनिता लोकरे, सौ सीमा कुरसंगे, भीमराव कांबळे व सर्व नागरिक व महिला उपस्थित होते.