
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील येत असलेल्या लाडकी येथील गावाला लागून असलेल्या पुलाची उंची वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी केली आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईके यांच्याकडे मागणी केली आहे,सदर लाडकी गावाला लागून असलेला हा पूल या पुलाची उंची अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे परिसरात थोडा जरी पाऊस पडला की या पुलावरून ओसंडून पाणी वाहते त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो आणि पुलावरून पाणी उतरेपर्यंत ग्रामस्थांना तिथेच ताटकळत उभे राहावे लागते याचा नाहक त्रास ग्रामस्थांना व शाळकरी विद्यार्थ्यांना सोसावा लागतो त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी लाडकी येथील शंकरभाऊ राऊत,शेखरभाऊ मांडवकर, मोहनभाऊ गुडदे,गोलूभऊ काटकर यांनी निवेदनातून आमदाराकडे मागणी केली आहे.
