नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे यांच्या प्रयत्नातून रमाई आवास योजनेंतर्गत एकोणतीस घरकुलांना मंजूरी

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा शहरात प्रथमच रमाई आवास योजनेंतर्गत एकोणतीस घरकुलांना मंजूरी मिळाली असून यासाठी नगराध्यक्षा सौ.सुलभाताई गुरुदास पिपरे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राज्याचे वने, सांस्कृतीक, मस्त्य व्यवसाय मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा शहरातील रमाई आवास योजनेंतर्गत एकोणतीस घरकुल मंजूर झाले असून चंदपूर जिल्ह्यातील एकुन दहा नगरपंचायत तथा नगरपरीषदांमध्ये पोंभूर्णा नगरपंचायतला सर्वात जास्त घरकुलांची मान्यता मिळाली असून त्रुटीमध्ये असणार्या उर्वरीत घरकुलांचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागणार आहे तसेच सि. टि. सव्हैचा काम सूद्धा अंतीम टप्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल सूद्धा लवकरच मंजूर होणार असल्याचे पोंभूर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सुलभाताई गुरुदास पिपरे यांनी सांगितले….