
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी खैरी परिसरातील लोकांच्या सोयीनुसार वडकी खैरी येथे ग्राहक पंचायतीच्या तालुका कार्यकारिणीची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली.त्यामध्ये शाखा अध्यक्षपदी डॉ.अशोक फुटाणे, उपाध्यक्षपदी कचरूलाल झामड, उपाध्यक्षपदी त्र्यंबकराव महाजन, सचिवपदी हरीभाऊ नंदुरकर,सहसचिव पदी अरूण फुटाणे, प्रदीप राऊत, कोषाध्यक्षपदी ज्ञानेश्वर जवादे, महिला प्रमुखपदी अँड पुनम पुनेवार, कार्यालय प्रमुखपदी कृष्णकुमार मोहता, प्रचार प्रसिद्धी प्रमुख नंदकिशोर कचवे,विधी आयाम प्रमुखपदी प्रमोद डाहुले, पर्यावरण प्रमुखपदी राजेंद्र कोंबे,सेल प्रमुखपदी हरीविजय वानखेडे, रोजगार सुजन प्रमुखपदी प्रशांत पिपराडे, कार्यकारिणी सदस्य म्हणून किशोर ढोमणे, पुंडलिक भोयर, नरेंद्र झिले, प्रशांत येन्नरवार, प्रकाश चिव्हाणे, गजानन काकडे, अनिल करपते,सौ. नंदा चौधरी यांची निवड करण्यात आली त्यावेळी ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष प्राचार्य नारायणराव मेहरे, जिल्हा अध्यक्ष अनंत भिसे, विदर्भ प्रांत कोषाध्यक्ष संतोष डोमाळे जिल्हा सहसचिव जिनेंद्र बंगाले, उपजिल्हा उपाध्यक्ष डॉ.कैलास वर्मा,कार्यकारणी सदस्य शोभाताई इंगोले तसेच वडकी खैरी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यकारणीच्या निवडीमुळे वडकी खैरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
