
राळेगाव तालुक्यातील मेंघापूर बोरी संघम येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नितीन खडसे यांच्या हस्ते आज दिनांक १६/८/२०२३ रोज गुरूवारी अंगणवाडीच्या २५ मुला मुलींना ड्रेस वाटप करण्यात आला.त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्षय काळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेखर डोंगरे, ग्रामपंचायत सचिव वडे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश थुल, अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
