वडकी पोलिसांची अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राळेगाव रोडवरील टाकळी येथुन अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाढोना बाजार येथे जात असताना वडकी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी कार्यवाही केली व ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला यामध्ये आरोपी अमोल अशोक ठाकरे वय २६ वर्षे व दिवाकर विठोबा येपारी वय ५२ वर्षे यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे . एकूण पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी गजानन आडपवार, संदीप मडावी, निलेश वाढई व उध्दव घुगे यांनी केली.