
:-
पोलीस विभाग विविध कामानी किंवा कोणते गुन्हे उघडकीस करण्यात नेहमीच चर्चेत असतोच. खाकी वर्दीतील तो पोलीस फक्त खाकी पुरताच किंव्हा गुन्हेगारांच्या मागावर आपले गुन्हे उघडकीस आणण्याकरिता तेव्हढ्यापुरतेच त्याचे अस्तित्व नसुन त्या खकिमधीदेखील असा एक देवमाणूस असतो याचे जिवंत उदाहरण शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या कायर मध्ये दिसुन आलं.
कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते, कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो? खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो. फक्त नियमांचे शस्त्र व जबाबदाऱ्या त्यांच्या ओंजळीत असते. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. प्रत्येक वेळी गुन्हेगारांना वठणीवर आणणारे आक्रमक पोलीस आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण याच पोलीस दादांनी केलेल्या सामाजिक कामामुळे देखील खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडते. असाच काहीसा प्रकार पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे वाट चुकलेल्या “तो” सुखरूपपणे तिच्या कुटुंबात रवाना केल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले. तक्रार नसतानाही पोलिसांनी यात लक्ष घातल्याने तो सुखरूप घरी पोहोचला आहे.
गणेशोत्सवनिमित्त शिरपूर पोलिसांचा ताफा कायर गावात पेट्रोलिंगकरीता दाखल झाला. तेव्हढ्यात पोलिस कर्मचारी अनिल सुरपाम व त्यांच्या चमूला एक मळकट कपडे घातलेला आणि नकोसा वाटणारा व त्याची तब्येत हालावलेली… असा एक व्यक्ती निदर्शनास आला. त्याजवळ शिरपूर पोलिस कर्मचारी गेले असता त्याला त्या परिस्थितीत पाहून माहिती घेत असताना त्याची भाषा कोणालाच न समजणारी. पण तेलगू भाषेत काहीतरी बडबड करत होता, तर्क वितर्क लावण्यात पोलिसी खाकी खूप माहिर असतात असे बोलल्या जाते…. त्याचा तेलगू भाषेवरून हा तेलंगणा किंवा आंध्र राज्यातील असावा असा अंदाज लावला. शिरपूर ठाणेदार संजय राठोड यांनी त्यांचा जवळील तेलंगणा पोलिसांसोबत संपर्क साधला व शिरपूर स्टेशन मध्ये हा अनोळखी व्यक्ती आहे व मोबाइल नंबर देखिल दिला. या अनोळखी व्यक्तीचा फोटोही पाठविला. त्या तेलंगाना पोलीसांनी तेलंगाना भागातील पोलिस विभाग व त्या राज्यातील समाज माध्यमावर(सोशल मीडिया) वर प्रसारित केला असता अवघ्या एका तासात त्या इसमाचे गावातील “अनमकोंडा” जिल्ह्यातील एका सरपंच यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शिरपूर पोलिसांकडे असणारा हा धर्मपूरम या गावातील आहे.त्याचे पूर्ण नाव मेहकला रमेश परमया (वय 45 वर्ष) रा.धर्मपुरम ता.धर्मसागर ,जिल्हा अनमकोंडा, तेलंगणा राज्य असे असून 400 किमदूरवरचा आहे. तो मागील 2 महिन्यापासून घरून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु तो मिळाला नव्हता.
या गावातून लगेच नातेवाईकांना रवाना करून ताब्यात घेण्याकरिता पाठवत आहोत तोपर्यंत त्याची काळजी घ्या अशी तेथील सरपंच यांनी विनंती केली. शिरपूर पोलिसांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे भरती करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व दिनांक 23 सप्टें.रोजी त्याचे नातेवाईक राजू दासरी गठैया (मामा), भोलाबाईना हरीकिसन (मेहुना) हे खाजगी वाहनाने कायर येथे आले. त्यांची शिरपूर पोलिसांनी खात्री करून या व्यक्तीस नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्या वाट चुकलेल्याची पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार असून सर्व जण त्याच्या शोधात होते. शेवटी त्यांनी महाराष्ट्र पोलिसाबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त केली. शिरपुर पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांना धन्यवाद दिले. सदर कार्य गणेश किंद्रे साहेब यांचे मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार शिरपूर संजय राठोड,PSI रामेश्वर कांडुरे,बीट अंमलदार अनिल सुरपाम, अभिजीत कोशटवार, राजन इसंनकर यांनी केली.
