अवैध कृषी पंपाकरिता वापर करण्याऱ्या वीज चोरावर महावितरण राळेगाव धडक कारवाई

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दि 5/11/23रोजी पिपंरी दुर्ग. कृष्णपूर, जलका, वरणा येथील कृषी पम्प करिता महावितरण च्या लघुदाब वाहिणीवर अकोडा टाकून, केबल दयारे वीज चोरी करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली . महावितरण राळेगाव येथील सहाय्यक अभियंता. कर्तव्यदक्ष जगदीश ढूमणे व वीज कर्मचारी सचिन सरोदे, विकेश करडे, विलास टेकाम, विशाल पेंदोर, उमेश ढूमणे, आकाश काळे अवसरमल यांही कार्यवाही केली. कार्यवाही दरम्यान 450मी. केबल व चार स्टार्टरपेटी जप्त करण्यात आले.


सहाय्यक अभियंता याचे अभिप्राय


कृषी ग्राहकांना आवाहन करण्यात येते की आपल्या रोहित्रा वर जर कोणी अवैध रित्या वीज वापर करत असेल तर महावितरण राळेगाव यांना फोन दयारे कळविण्यात यावे. जेणे करून वीज चोरी थांबवता येईल. महावितरण ही वीज हानी कमी होईल.