
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
वीर भगत सिंग संघटना राळेगाव तर्फे 11/एप्रिल/2026* रोज शनिवार ला क्रीडा संकुल राळेगाव येथे वीर भगतसिंग संघटनेचे सदस्याची शासकीय नोकरी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी प्रदून्ये इंगोले रा. राळेगाव यांची महाराष्ट्र सुरक्षा फोर्स ( MSF) ,नयन पेंदोर रा. राळेगाव यांची महाराष्ट्र सुरक्षा फोर्स ( MSF) ,मेहुल गजानन लांभाडे रा. रिधोरा यांनी ग्रॅज्यूएट फार्मसी ऍप्टीट्यूड टेस्ट (GPAT) 2026 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तो एम. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.केतन गुणवंतराव इंगोले याची महाराष्ट्र ग्रामीण बँक असिस्टंट मॅनेजर सोबतच SBI सिनियर क्लार्क सोबत 2 शासकीय नोकरी उत्तीर्ण.* या चारही विध्यार्थ्यांचा वीर भगत सिंग संघटना राळेगाव तर्फे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनय मुनोत, प्रमुख पाहुणे शंकर सायसे, संजय एकोणकर, महेश भोयर,अँड. वैभव पंडित,नूतन टिपले ,वसीम पठाण वीर भगत सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सागर एम्बडवार, सुरज गुजरकर,सागर वर्मा, स्वप्नील हजारे, शैलेश ठाकरे, सौरव नारनवरे, रोहित पिंपरे, समीर भगत,रोहित अवसरमल ,निर्भय काकडे , आशुतोष सेगेकर, ऋषिकेश पिंपरे,समीर उजवणे , अनिकेत वनस्कर, अजय चांदेकर , ऋषिकेश पिंपरे व नवोदय क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य तसेच सर्व युवा व मित्रपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विर भगत सिंग संघटना व नवोदय क्रिडा मंडळ राळेगाव यांनी केले होते.
