
राळेगांव पंचायत समितीचा पुढाकार
सिंचनाचा प्रश्न दुरकरण्यासाठी प्रयत्न
रामभाऊ भोयर राळेगांव
राळेगांव: नरेगा अंतर्गत तालुक्यात येत्या काळात १०९५ विहिरी होणार आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ह्या विहिरी होणार असून पंचायत समितीच्या नरेगाविभागा मार्फत तालुक्यात या विहिरी येत्या काळात होणार आहेत तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याकरता पंचायत समितीच्या नरेगा विभागामार्फत ही योजना राबवली जात आहेत प्रत्येक गावात पंधरा विहिरी असं गावाला लक्षांक आहेत विहीर बांधण्याकरता चार लाख रुपयाचे अनुदान शासन देणार आहेत अट एकच की ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही विहीर बांधल्या गेली पाहिजे याकरिता शेतकऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये अर्ज करायचा आहे अर्जाची छाननी झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला ती वीहिर मंजूर करण्यात येईल अर्ज करण्यासाठी तो शेतकरी अल्पभूधारक असावा म्हणजे त्याच्याकडे पाच एकर पेक्षा कमी शेती असावी ही अट आहे अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना ही अट शिथिल आहे १०९५ विहिरी तालुक्यात होणार असल्याने निश्चितच विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहेत यामुळे शेतकऱ्यांचे भाग्य बदलणार एवढे निश्चित महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या विहिरी ग्रामीण भागात होणार असल्याने राळेगावकरांच्या नशिबी मात्र पुन्हा एकदा निराशा आली आहेत २०१८-१९ मध्ये तालुक्यामध्ये धडक सिंचन विहीर योजना राबवण्यात आली होती ज्यामध्ये राळेगावकरांना काही विहिरी मिळाल्यात पण राळेगाव मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या कुठल्याच योजना राळेगावकराणा मिळत नाही परिणामी विहिरींच्या योजना पासून सुद्धा राळेगावकर वंचित आहे ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विहिरी होत असताना राळेगावकरांना मात्र केवळ नगरपंचायत असल्यामुळे विहिरिपासून वंचित राहावे लागत आहे राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नगरपंचायत शहरासाठी विहिरींची योजना राबवू शकते यामध्ये नगरपंचायत तसेच संबंधित विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे कारण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी राहतात व हे शेतकरी केवळ नगरपंचायत हद्दीत आपले गाव किंवा शेत आहे या कारणांमुळे विहिरीपासून वंचित राहत आहेत अशी भावना राळेगावकरांच्या मनामध्ये घर करून आहेत यापेक्षा ग्रामपंचायत असती तर बरे झाले असते असे सुद्धा शेतकऱ्यांना वाटत आहे यासाठी निश्चितच नगरपंचायत शासन प्रशासन आणि संबंधित विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे जेणेकरुन राळेगावातील शेतकऱ्यांना सुद्धा अनुदानावरती विहीर मिळेल.
