
सहसंपादक : रामभाऊ भोयर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ , जिल्हा परिषद यवतमाळ ,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच काही दिवसा आधी वेळापत्रक जाहीर झाले असून 22 जुलै 2025 ला बुद्धिबळ ही स्पर्धा आयोजित करून उद्घाटन या स्पर्धेचे करण्यात आले होते त्यानुसार तालुक्यातील दहा खेळाचे आयोजन तालुका क्रीडा समिती , राळेगाव च्या वतीने आयोजित केलेले आहे असून , 25 जुलै रोजी आर. एम. इंटरनॅशनल स्कूल राळेगाव येथे योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धे करिता पंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून योगगुरु डॉ . भिमराव कोकरे हे उपस्थित असून यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन स्पर्धा पार पडल्या आहे .
डॉ. कोकरे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की,
योगासन केल्याने शारीरिक , मानसिक आरोग्य सुधारते . योगामुळे शारीरिक लवचिकता , ताकद , संतुलन सुधारते आणि तणाव कमी होतो तसेच योगामुळे मानसिक स्पष्टता एकाग्रता आणि भावनिक नियंत्रण सुधारते. तसेच विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व देत डॉ. कोकरे म्हणाले की, योगाचे नेहमीच सराव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात आणि त्यांना चांगले आरोग्य चांगले शिक्षण आणि चांगले जीवन जगण्यात मदत होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना तालुका क्रीडा संयोजक प्रफुल्ल खडसे यांनी डॉ. कोकरे यांनी केलेले योगासन मार्गदर्शन मूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात रुजवावी असे आवाहन तालुका क्रीडा समिती तर्फे केले आहे . सदर स्पर्धेत तालुक्यातील शाळेचा चांगला प्रतिसाद असून दरवर्षी तालुक्यातील योगा खेळाडू संख्येत वाढ होत आहे ही अत्यंत आनंदाची बातमी असल्याचे तालुका क्रीडा संयोजक यांनी म्हटले आहे.
तालुक्यातील स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. घनश्याम राठोड तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या असून योगासन स्पर्धेत क्रीडा शिक्षक श्री. किशोर उईके , आर एम इंटरनॅशनल स्कूल चे व्यवस्थापक श्री. नागेंद्र शुक्ला , . अंकुश चव्हाण , जितेंद यादव थूल सर, आर्यन देवकर, हिमांशु ठाकरे , चेतन नाकाडे व आर. एम शाळेतील शिक्षक उपस्थित होते .
