
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव
उमरखेड तालुका मधील बिटरगाव पोलीस स्टेशन हे इंग्रज काळामध्ये दगड व सिमेंट यामध्ये जुने बांधकाम केलेले आहे. पूर्वी येथे अनेक ठाणेदार कर्तव्यदक्ष ठरून गेले. त्यातील एक ठाणेदार प्रताप भोस साहेब यांनी प्रशासकीय कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांची नियुक्ती पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे झाली आहे. प्रथमच बिटरगाव पोलीस स्टेशन पदी महिला ठाणेदार सुजाता बनसोड8 यांची नियुक्ती करण्यात आली जशी पोलीस स्टेशनची निर्मिती झाली तसी प्रथमच महिला ठाणेदार यांच्या हाती प्रभार देण्यात आले असून नक्कीच महिलाने आपली उत्कृष्ट कार्यपद्धती करून जबाबदारी निभवतील अशी आशा व्यक्त केली आणि वैद्यकीय अधिकारी ढाणकी शहर येथे डॉक्टर स्वाती मुनेश्वर यांनी सुद्धा महिला असून प्रथम ढाणकी विच्छेदन कक्षामध्ये एका पुरुषाचे विच्छेदन करून महिला डॉक्टरने प्रथमच स्वतःचे गौरव वाढवले आहे. व आज तर अनेक क्षेत्रांमध्ये महिलेचा दर्जा उंचावलेला आहे. राष्ट्रपती पद महिलेने मिळविला आहे, आज विविध शासकीय क्षेत्रात सैन्य दल, पायलट, शिक्षिका, कलेक्टर, बी.डी.ओ. तहसीलदार, ग्रामसेविका,नर्स विविध ठिकाणी प्रथम स्थान मिळविले आहे.
