
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे,भद्रावती
चैतन्य कोहळे,भद्रावती-चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विषमय बहादे यांनी केंद्रीय कोल मंत्री, तसेच रेल्वे राज्यमंत्री यांची भेट घेत माजरी येथील स्थानिक माजरी जंक्शन ची एक लाईन उत्तर भारत ते दक्षिण भारत ला जोडणारी एकमात्र रेल्वे लाईन आहे त्यावर भद्रावती माजरी मुख्यरस्त्यावर दोन रेल्वे गेट पडतात ते गेट रेल्वे वाहतुकीमुळे सारखे बंद अवस्थेत असतात आणि ही रेल्वे चे मुख्य मार्ग असल्यामुळे ह्या रुळावरून दिवसभरात भरपूर रेल्वे गाड्या येजा करणाऱ्या असतात त्यामुळे हे दोन्ही गेट दहा ते पंधरा मिनिटातच बंद करावे लागते
दरम्यान माजरी परिसरातील जवळपास तीस हजार लोकसंख्या असून उधोग प्रकल्प तसेच वेकोली प्रकल्प असलेला परिसर असल्यामुळे येथील रेल्वे गेट तासन तास वाहतूक बंद अवस्थेत असते कित्येकदा तर दवाखान्याची अंबुलन्स मध्येच स्त्री प्रस्तुती झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही वेक्ती ना वेळेवर उपचार न मिळाल्याने रेल्वे गेट जवळ मृत्यू झाल्याची घटना सुद्धा घडल्या आहेत,तसेच शालेय विध्यार्थ्यांना वेळेवर शाळेत हजर होण्यासाठी सुद्धा जीव पणाला लावावा लागतो तसेच वेकोली कर्मचारीही तासनतास या गेट मुळे अडकून ड्युटी वर वेळेवर जाण्यास वाट पाहत अडकून पडलेले दिसतात करिता बहादे यांनी माजरी भद्रावती मार्गावर उड्डाणपूलाची मागणीसाठी रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे.
