राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे गोवारी शहिदांना श्रद्धांजली

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

आदिवासी असताना शासनाने चुकीचे अध्यादेश काढले ते अध्यादेश मागे घ्यावे यासाठी नागपूर येथे झालेल्या संघर्षात ११४ गोवारी बांधवांचा बळी गेला या घटनेला मंगळवारी २७ वर्षे पूर्ण झाली आहे त्या स्मृतिदिना निमित्त अंतरगाव येथे दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोज मंगळवारला गोवारी समाज संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरपंच प्रवीण एंबडवार, गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रज्वल सोनवणे, उपाध्यक्ष रितिक चहारे, सचिव शिवम वगारहांडे, उपसचिव शिवम ठाकरे, तर सदस्य तुषार दूधकोहळे, प्रथमेश नेहारे, अंकित नेहारे,माणिक नहारे, विनोद दुधकोहळे,मारोती नेहारे, श्रीकृष्ण सोनवणे, राम वगारहांडे आधी गोवारी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.