
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आष्ठा येथे सुरु असलेली अवैध दारू विक्री कायम स्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी येथील महिलांनी केली आहे. गावात खुलेआम मोहाची व देशी दारू विक्री सुरु असल्याने गावाची शांतता धोक्यात आल्याची तक्रार ठाणेदार राळेगाव यांना दिली.
गावात प्रमोद घोसे, सचिन कांबळे, शँकर उईके हे अवैध दारू विकतात. आम्ही पोलीसांना हप्ता देतो तुम्ही काय करायचे ते करा अशी दमदाटी करतो असा आरोप महिलांनी केला आहे. नशा यावी म्हणून यात विषारी द्रव्य टाकण्यात येत असल्याचा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे. या मुळे जीवितहानीचा धोका होऊ शकतो. या वेळी ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांनी महिलांचा प्रश्न समजून घेतला त्यांच्याशी चर्चा केली व कारवाई करण्याचे आस्वासन दिले.
गावातील जि. प. शाळेजवळ दारू विक्री होत असल्याने लहान मुलांना, महिलांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे . 7 दिवसात ही दारू विक्री बंद करा, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची जबाबदारी पोलीस विभागाची राहील असा इशारा देखील ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
या वेळी शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी निवेदन दिले या वेळी
सोनू विशाल तोडासे,वनिता रमेश कोटमकर,चंदाबाई शालिक जळेगार, सुमन विलास मांढरे, कांता वसंता परिस,मंगला रमेश मांढरे, वर्षा अमर भोरे,मंगला वासुदेव मांढरे,अरुणा नागपुरे, माळाबाई मधुकर मांढरे,संगीता सुभाष मांढरे, सुरेखा संदीप मांढरे, संगीता मंगेश आष्टकार, लता सुरेश उईके,सौमित्रा भोला पाल, पुष्पा महादेव खेकारे, लता विजय वाघमारे,माला विजय पारिसे,संगीता सुरेश करलुके,मंदाबाई ताणबाजी पारिसे,सारिका प्रवीण पारिसे, सिंधूबाई पुरोषात्तोम मांढरे,सुष्मा विलास उईके, पूजा प्रमोद मांढरे,डिम्पल सचिन मांढरे, गुंफा सुरेश मांढरे, मीरा शामराव पारिसे, दीपाली मंगेश मांढरे, कोमल विजय वादाफळे,शोभा रामाजी पारिसे,रुक्मा मारोती मांढरे, छाया भास्कर राजूरकर,कमला रामूजी वादाफळे,वचला नामदेव करलुके, नीता अनिल मेश्राम, सीमा कांबळे,शालू किसना पारिसे, लता सुरेश उईके,निशा विनोद पारिसे,बेबीबाई शंकरराव मांढरे,स्वाती वादाफळे,ज्योती भा. मांढरे, सौं. सारिका प्रकाश मांढरे,सौं. कलावतिबाई ग. मांढरे, सौं. अश्विनी आ. पारिसे, सौं. राधा ज्ञा. पारिसे,सौं. दिपाली मिलिंद भगत आदी महिलां उपस्थित होत्या
