
प्रतिनिधी:शंकर चव्हाण ,दिग्रस
दिग्रस तालुक्यातील विठाळा या गावात पुर्वे कडील वसाहतीत जुन्या एकच टाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होत होती. एकच टाकीचे पाणी गावकऱ्यांना पुरेसे नव्हते .त्यातच 2ते 3दिवसाआड नळ यायचे त्या मुळे पूर्वे कडील महिलांना पश्चिम कडे पाण्यासाठी यावं लागे. त्यामुळे एकहाथी सत्ता असलेल्या महिला सरपंचा सौ. शारदा राजेश राठोड यांच्या पाठ पुराव्याने राज्य शासनाच्या जल जीवन मिशन या योजने अंतर्गत पूर्वे कडे एक पाण्याची टाकी व मुख्य रस्ते च्या कडेला सांड पाण्याची नाली बांधनाचा निर्णय घेतला असून सदर टाकीचे काम युद्ध पातळी वर सुरु झाले असता, सरपंचा सौ. शारदा राजेश राठोड व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे ग्रामवासियांतर्फे स्वागत होत आहे.
या पाण्याच्या टाकी मुळे या भागातील गावकऱ्यांची पाण्यासाठी ची वणवण थांबणार असून शुद्ध पिण्याचे पाणी त्यांना उपलब्ध होणार आहे.या योजनेसाठी गावकऱ्यांनी सरपंच व सदस्य ,प्रशासनाचे आभार मानले आहेत.
