डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकसंघ भारताचे निर्माते आहे:युवा सरपंच स्वप्नील खवशी यांचे प्रतिपादन

:-

कारंजा (घा):- दिनांक १४ एप्रिल रोज शुक्रवारला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संपुर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जातात.याच जयंतीचे औचित्य साधत कारंजा तालुक्यातील बेलगांव येथे भीम जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा बेलगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयात भीम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालण्यात आले व उपस्थित सर्वांनी फोटोंचे पूजन करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.बेलगांव येथील व तालुक्यातील सर्वात युवा सरपंच असलेले स्वप्नील खवशी यांनी संविधान निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या संघर्षाने भरलेल्या जीवनावर आधारित माहिती दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज सध्या या देशाला आहे ,बाबासाहेब डोक्यवर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे असे मत खवशी यांनी व्यक्त केले.यावेळी या कार्यक्रमाला स्वप्नील खवशी,शुभम आत्राम,विमल आत्राम,दुर्गा खवशी,अर्चना आमझीरे, गोदावरी आत्राम,विदेश आत्राम,विजय शिरसाठ,सोहेल तायडे,मुकेश गायकवाड, बंडू आमझीरे, साहेबराव हिंगवे, बाबुलाल हिंगवे, हिरालाल युवणाते,अरुण आत्राम,प्रकाश युवनाते आदी इतर नागरिक उपस्थित होते.