चिंचघाट येथील मुख्य रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा चोरीला

यवतमाळ तालुक्यात चिचघाट मध्ये एक अजब घटना घडली आहे, कालव्यावर बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूलाचे पाईप गायब झाला आहे. पनास मिटर रुद आणि चार फुट लांबी असणारा हा पूल अज्ञान चोरट्यांनी चोरी करून नेला धक्कादायक म्हणजे पूल कठडा चोरण्यासाठी आरोपींनी गॅस कटरचा वापर केला व वाहने आणि साधने वापरली हा पूल चिचघाट गावात असलेल्या येराबाळा घाटाजी मुख्य रस्त्यावरील पूल पाडून ट्रकमध्ये भरून तो पूल दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता गावकऱ्यांना प्रश्न पडल आहे पुलावरून जनावरे मोटर सायकल कशा घेऊन जायच्या पूलाला कठाळा नसल्यामुळे जाने धोकादाय आहे तर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पूल ची दुरुस्ती करावी व ग्रामस्थाची गैरसोय टाळावी आणि आरोपी चा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाही कारावी अशी मागणी गावकरी करत आहे या संदर्भाचे निवेदन२४ ऑगस्टला कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यवतमाळ यांना देण्यात आले त्यावेळी पोलिस पाटील विरेंद्र राठोड ओम राठोड मनसे सर्कल विभाग प्रमुख ,अमोल पवार ,खुशाल ढेगळे ,अवीनाश राठोड ,शुभम पवार प्रशात राठोड ,बंन्टि राऊत ,विक्रम पवार, लखन पवार ,हेमंत चव्हाण ,प्रितम चव्हाण , राहुल जाधव, धिरज चव्हाण व मोठ्या संख्याने गावकरी उपस्थित होते