आमदार प्रा डॉ अशोक उईकेंची नुकसानग्रस्त गावांना भेट

राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)

मान्सून पूर्व आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील दहा गावांना फटका बसला .राळेगांव मतदार संघाचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी दिनांक ७ जून ला दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला .तालुक्यात ४जूनला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने दहा गावे प्रभावीत झाली .घरांचे ,शेती बैल व बैलबंडी चे नुकसान झाले . महसूल प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल दिला आहे .आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी आज ७जूनला एकबुर्जी ,भांब ,कोपरी, इंजापूर ,वालदुर या नुकसान ग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला नुकसान ग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशा सूचना केल्या शेतातील मोसंबी ,लिंबू बागेचे नुकसान झाले त्यांनाही त्यांनाही आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करताना आ प्रा डॉ अशोक उईके यांच्या सोबत भाजपा तालुका अध्यक्ष तथा जि प सदस्य चित्तरंजन कोल्हे,प स सभापती प्रशांत तायडे, भाजपा शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर शेतकरी ग्रामस्थ हजर होते .

ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन

ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट चे आज दिनांक ७जून सोमवरला आमदार प्रा डॉ . अशोक उईके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे ऑक्सिजन प्लॅन्ट मंजूर झाला परंतु प्रशासकीय बाबी पूर्ण व्हायच्या असल्याने काम सुरू झाले नाही .शासनान स्तरावरून मंजुरात आल्यामुळे आज आमदार उईके यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांट चे भूमिपूजन करण्यात आले यावेळेस उपविभागीय अधीकारी शैलेश काळे,तहसीलदार रवींद्रकुमार कानडजे गटविकास अधिकारी रविकांत पवार,जि प सदस्य तथा भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, प स सभापती प्रशांत तायडे, शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर ,डॉ प्रकाश चिमनानी डॉ भीमराव कोकरे माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे , बाळासाहेब दिघडे ,अरुण शिवणकर, किशोर जुणूनकर, सागर वर्मा प्रफुल कोल्हे शुभम मुके विनोद महाजन उपस्थित होते.