
लोकगीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव
कापसाचा दर 7000 ते 8000 व सोयाबीनचे दर चार हजार ते पाच हजार एवढ्यावरच थांबलेला आहे. म्हणून शेतकऱ्याने दोन वर्षापासून कापूस घरात साठवून ठेवले आहे. या कापसाच्या बोंड आळी मुळे घरातील वातावरण दूषित होत आहे. व अंगाला फोड येत आहे, घरातील लहान मोठ्या व्यक्तींचं गंभीरतेने चर्मरोग होत असल्याने आढळले आहे. यामध्ये शेतामधल्या पांढऱ्या सोन्याचे भाव व पिवळ्या सोन्याचे भाव आज कधी बदल होईल याची वाट बघता बघता दोन वर्ष होऊन गेलीत. आज पर्यंत कापूस आणि सोयाबीन चा भाव वाढलेला नाही, शेतकऱ्याने इतरांकडून हंगाम करण्यासाठी घेतलेला कर्ज व्याजदराने घेतलेले दागिने याचा मोबदला कसं चुकवणार जे शेतकरी कोरडवाहू जमिनीमध्ये बियाणं टाकतात त्याची व्यवस्थितरित्या खतपाणी देऊन वाढ करतात औषधे फवारण्यासाठी पैशांची गरज भासते याकरिता कर्जबाजारी झालेला शेतकरी गळफास लावणार नाही तर काय करणार! मार्च संपलं की व्याजदर घेतलेल्या कर्जावर वाढते ते शेतकरी घरातच कापूस असल्याकारणाने परतफेड कशी करणार योग्य वेळेत योग्य भाव नसल्याकारणाने शेतकरी कापसा प्रमाणे मनातल्या मनात कुज मरून जातो, त्यातल्या त्यात पावसाने व वाऱ्याने मोठे कहर केले आहे. शेतातलं हंगाम शेतातच गहू व चना काढत असताना उमरखेड तालुक्यात ठीक ठिकाणी मोठ्या वर्तवात पावसाने गहू आणि चना भिजून गेलेला आहे. शेतकऱ्यांनी खायचं तरी काय तोंडावरचे घास चोरून नेल्यागत झालं निसर्गाने पण शेतकऱ्याला सोडलं नाही. भावा सरकारने पण सोडलं नाही शेतकरी काय करणार बिचारा!
श्री. विक्रम उत्तम राठोड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, प्रभारी(सरपंच) मेट यांनी शेतकऱ्या विषयी असं मनोगत व्यक्त केलं.
