वरूड जहांगीर येथील वार्ड न.1 चे रहिवासी मालकी हक्कापासून वंचित, ताबडतोब कारवाई करण्याची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे गाव 9 सदस्यीय ग्रामपंचायतीचे गाव असून या ग्रामपंचायतीत तीन प्रभाग असून प्रभाग क्रमांक एकमध्ये बंजारा वस्ती,गोंडपुरा व नविन वस्तीतील काही भाग असा प्रभाग असून या प्रभागातील काही भागात नविन वस्ती झाली असून उर्वरित भागात एक आरोग्य उपकेंद्र झाले असून एक समाजमंदिर आहे आणि याच उर्वरित भागात जे गरजू रहिवासी लोक गेल्या पंचवीस वर्षांपासून रहात असून या रहिवासी लोकांनी या ठिकाणी आपापल्या घरी शौचालय, इलेक्ट्रिक सुद्धा घेण्यात आली असून ते सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात असून या रहिवासी लोकांना ग्रामपंचायत सर्व सोयी उपलब्ध करून देत असून या घराच्या मालकी हक्कापासून का वंचित ठेवत आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून ग्रामपंचायत ही जागा आमच्या मालकीची नसून रघुनाथ स्वामी महाराज देवस्थानच्या मालकीची आहे असं सांगत असून ही जमीन देवस्थानच्या मालकीची आहे तर याच जागेवर आरोग्य उपकेंद्र आहे समाजमंदिर कसे आणि कोणत्या आधारावर बांधले आहे याची चौकशी करून तोच आधार घेऊन आम्हाला सुद्धा घराचे मालकी हक्क पट्टे देण्यात यावे जेणेकरून आम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी सोईचे होईल. आम्ही येथील रहिवासी शासनाला या निवेदनाद्वारे विनंती करतो की या प्रकरणात लक्ष देऊन चौकशी करून आम्हाला घराचे मालकी हक्क पट्टे देण्याची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्ही रहिवासी आपणास फेरनिवेदन सादर करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.