

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
वेद ग्राम समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी आयोजित केलेली कार्यशाळा गुरुवार दि. ०८-१२-२०२२ रोजी वसंत जिनिंग भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगाव येथे पार पडली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मिलिंदभाऊ इंगोले ख.वि.सं.अध्यक्ष (राळेगाव) तर उद्घाटक म्हणून दीपकभाऊ देशमुख प्रगतशील शेतकरी (वाटखेड) हे होते, मार्गदर्शक ज्ञानेश्वर बोडके संस्थापक अध्यक्ष अभिनव फार्मर्स क्लब पुणे,भूषण राऊत, श्रीकांत भांबुरकर, प्राजक्ता पुसदकर यांचे मार्गदर्शन लाभले तर भुपेंद्रजी कारीया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते (राळेगाव) अंकुशभाऊ मुनेश्वर अध्यक्ष तालुका सरपंच संघटना यांचे उपस्थित संपन्न झाली.
कार्यशाळे दरम्यान संदीप कदम शेतकरी कोठा सुधीरभाऊ जवादे सरपंच(किनी जवादे),प्रदीप कोरडे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तथा सामाजिक कार्यकर्ते, युसुफ अली सय्यद शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते (राळेगाव) यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे निराकरण ज्ञानेश्वर बोडके यांनी केले.
कार्यशाळेचे मुख्यसंयोजक गंगाधर घोटेकर सामाजिक कार्यकर्ते व सर्व पत्रकारांच्या वतीने रामुजी भोयर पत्रकार यांचा ज्ञानेश्वर बोडके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक किशोरजी चौधरी संचालक विचार विकास सामाजिक संस्था (वरोरा) यांनी तर सूत्रसंचालन कुणाल इंगोले उपसरपंच ग्रा.प.(पिंपरी)व आभार प्रदर्शन राजूभाऊ तेलंगे सरपंच ग्रा.प.(रावेरी) यांनी केले, कार्यशाळा यशस्वी करण्या करिता.जीवनजी खंगन साहेब य.जि.म.बँक वसुली अधिकारी (राळेगाव),प्रमोद कांबळे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन (राळेगाव), नारायण इंगोले उपसरपंच (चिकना),जयानंद टेंभेकर प्रथम एज्युकेशन फौंडेशन (राळेगाव), दिनेशजी कोल्हे सामाजिक कार्यकर्ते (राळेगाव), विवेक गोंडे सामाजिक कार्यकर्ते गुजरी,अखिल धांदे ग्रा.प.सदस्य (गुजरी) ,भूषण उंडे रोजगार सेवक (रावेरी) व इतरांनी विशेष परिश्रम घेतले.
