
रेती उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर
घरकुलधारकांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश सध्या तरी हवेत वि रला असून रेती अभावी घरकुल लाभार्थ्याचे बांधकाम रखडले असल्याने लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्याकरिता शासनाने घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करुन देण्यात यावी या आशयाचे निवेदन राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने दिं.४ एप्रिल २०२५ शुक्रवारला तहसीलदार यांना दिले आहे.
एकीकडे केंद्र शासनाच्या वतीने गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना राबविली या राळेगाव तालुक्यात पाच हजार घरकुलाना मंजुरी देवून घरकुल बांधकामाचा पहिला हप्ता दिला गेला आहे परंतु या मंजूर घरकुलासाठी शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना अद्यापही रेती मिळाली नसल्याने घरकुलाचे काम थांबले आहे त्याकरिता तालुक्यातील गोठे तसेच विहिरीचे बांधकाम रेती अभावी थांबले असून शासनाने या बांधकाम लाभार्थ्यांना तातडीने रेती उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा रेती उपलब्ध करून न दिल्यास राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेला आहे .निवेदन देतेवेळी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर, सचिव राजेंद्र तेलंगे,किशोर धामंदे ,सोनाली घोडाम, विजय धानोरकर ,विजय शेंडे, नितीन खडसे, बंडू पटेलपैक, रामेश्वर एडसकर, नरेश मडावी, दिलीप कोकाटे, संजय कांबळे,अरविंद डंबारे ,गणेश बुरले, प्रसाद ठाकरे, किशोर वाघ, श्रीकांत राऊत, श्रीकांत महाजन, प्रवीण येंबडवार, अर्चना गोवरदिपे, आदी सरपंच यावेळी उपस्थित होते.
