
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात रेती तस्करीला चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. वडकी पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू मॅक्स पिकअप वाहनाला जप्त केले.मात्र कारवाया सुरू असतानाही तस्करांचा उन्मत्तपणा कायम असल्याचे दिसून येते.
तालुक्यातील वडकी येथे रविवार दि २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या मॅक्स पिकअप वाहनावर कारवाई करण्यात आली.मॅक्स पिकअप चालकाकडे उपलब्ध रेती वाहतूक पास मधील माहिती
आणि प्रत्यक्ष रेती टाकण्याच्या ठिकाणात विसंगती आढळल्याने ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी १ ब्रास रेतीसह मालवाहू मॅक्स पिकअप क्रमांक एम एच ३६ ए,ए २२८३ जप्त करून तो वडकी पोलीस ठाण्यात लावला.या कारवाईत पोलिसांनी १ ब्रॉस रेती किंमत ६ हजार रु व मॅक्स पिकअप वाहन किंमत ५ लाख रु असा एकंदरीत ५ लाख ६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून यातील आरोपी अविनाश हनुमान सराटे (३६) याचेवर विविध कलमाखाली वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संदीप मडावी विनोद नागरगोजे यांनी केली आहे.
