
हिंगणघाट दि. 28/11/2022 स्थानीय जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालय येथील 11 वी व 12 वी (आटोमोबाइल) व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य विकसित करण्याकरिता क्षेत्रभेट करणे गरजेचे होते या करिता प्राचार्य गंगाधर ढगे व व्यावसाय प्रशिक्षक हर्षल बोधनकर यांच्या विनंती वरून अमित मोटर हिंगणघाट चे प्रबंधक अमित सर यांनी विद्यार्थ्यांना नियमानुसार परवानगी दिली.त्यानंतर क्षेत्रभेट देण्यात आली.क्षेत्रभेटी दरम्यान पवन सर यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत व कार्यात्मक मार्गदर्शन केले क्षेत्रभेटीचा शेवट व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे यांनी आभार करून केला. यासाठी प्राचार्य गंगाधर ढगे,पर्यवेक्षक सुनील फुटाणे, कुरेशी, डॉ अनिस बेग,व्यवसाय शिक्षक हर्षल बोधनकर, सुमित तलमले, व सर्व शिक्षक, पालक यांनी सहकार्य केले.

