
ढाणकी प्रतिनिधी.प्रवीण जोशी
ढाणकी येथील तीव्र पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करणे, नगरपंचायत ने केलेली वाढीव कर वाढ तात्काळ रद्द करणे, निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यात जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादी टाकने, येथील नागरिकांना तात्काळ मूलभूत सुविधा पुरवणे या मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देण्यात आले,
पाणीटंचाई ही ढाणकी वासियांच्या पाचवीलाच पुजलेली आहे शहरात सध्या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन करावा लागत आहेत, महिन्यातून फक्त दोनच वेळा नगरपंचायत कडून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने तळपत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी नागरिकांना आपली मोल मजुरी बुडून हंडा भर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, शहरात उद्भवलेली तीव्र पाणीटंचाई तात्काळ मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतने तातडीने उपाय योजना करून पाणी समस्या मार्गी लावून तीव्र पाणीटंचाई दूर करावी , तसेच ढाणकी नगरपंचायत ने मनमानी पद्धतीने केलेली कर वाढ , वृक्ष कर शैक्षणिक कर रोजगार हमीकर, गृहकर, पाणी कर, सामान्य कर याद केलेली वाढीव करवाढ तात्काळ रद्द करून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, तसेच येथील बहुतांश सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने रस्ता दुरुस्तीनंतर अल्पावधीतच रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडून रस्त्यावर धूळ तयार झाली आहे, रस्त्यावरील धुळीमुळे येथील नागरिकांना व्यापाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, सुभाष वाईन बार ते गजानन जिल्हावार त्यांच्या घरासमोरील निकृष्ट दर्जाच्या झालेल्या सिमेंट रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याचे आश्वासन नगरपंचायत प्रशासनाकडून आझाद समाज पार्टीला देण्यात आले होते परंतु अद्यापही रस्ता दुरुस्त झाला नसल्याने नगरपंचायत चे बांधकाम अभियंता, मुख्याधिकारी यांची सुद्धा चौकशी करून योग्य ती कारवाई करावी सदर निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादी टाकण्यात यावे अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली वरील लोक हिताच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास नगरपंचायत समोर आंदोलन छेडण्याचा इशारा आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे, शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर, तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव, महासचिव समाधान राऊत उपाध्यक्ष आबा गायकवाड, मार्शल विनोद बर्डे सर, लक्ष्मण भाऊ धुळे, प्रफुल दिवेकर, ऍड पंजाब नवसागरे, सुशांत घोंगडे,कोकणे, करण धोंगडे, सचिन वाहुळे, नागेश पाटील, सुमेध दवणे, दशरथ भिसे यांनी दिला आहे.
