विधानसभा समन्वयक पदी शशिकांत उर्फ बाळू धुमाळ

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांची राळेगाव विधानसभा महायुती समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सहीने त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.राळेगाव, कळंब व बाभुळगाव हे तिन्ही तालुके या कार्यक्षेत्रात महायुती मित्र पक्षात सुसंवाद व इतर महत्वाची जबाबदारी त्यांच्या कडे सोपवण्यात आली.
राळेगाव विधानसभा मतदार संघात भाजपा व घटक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी (AP) महायुती चे उमेदवार म्हणून प्रा. डॉ. अशोक उईके यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर झाले. यानंतर तातडीने मित्र पक्ष समन्वयक नियुक्त करण्यात आले. यात राष्ट्रवादी( AP) पक्ष राळेगाव तालुकाध्यक्ष तथा विविध समजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभाग असणारे शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली.त्यांना मित्र पक्षाशी सुसंवाद व समन्वयक म्हणून महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपा व मित्र पक्ष यांच्यात सुसंवाद साधून महायुतीला बळकट करण्याचे काम करू अशी भावना त्यांनी निवडी नंतर व्यक्त केली.