रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ,राळेगाव तालुक्यातील दापोरी गावात जाणारा रस्त्याची दुर्दशा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव वरून दापोरी हे गाव अवघे 20किलोमीटर असलेले दापोरी, जागजई ,उंदरी गट ग्रामपंचायत आहे. हे गाव असून राळेगाव वडकी रोडवर वनोजा समोर असून ह्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे.रस्ता हा जागोजागी खराब झाला असून रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे ते कळायला मार्ग नाही.तसेच रस्ता हा सर्व झाडांनी व कचऱ्यानी व्यापला असून या ठिकाणी झाडे कापण्याचे सौजन्य सुद्धा प्रशासन दाखवत नाही.परंतु ह्या गावाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते.या गावात एखादी आजारी जरी पडला तरी राळेगाव पर्यन्त कसे पोहचावे या बाबत तारेवरची सर्कस करावी लागते.या गावातील लोकांनी खूप वेळा चांगला रस्ता गावाला मिळावा म्हणून प्रयत्न केले पण याकडे सर्वचजण डोळेझाक करीत असल्याचे जाणवते व या रस्तानी छोटे मोठे अपघात झालेले आहे. हे सर्व प्रकार आमच्या लोकहीत महाराष्ट्र प्रतिनिधी जवळ सांगितलेले आहे.