एस एस एम विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार     

प्रतिनिधी:दिनेश काटकर

हिंगणघाट:- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस.एस.एम. विद्यालय हिंगणघाटचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल – २०२१ चा निकाल १०० टक्के लागलेला असून एकूण २९१ पैकी २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्राविण्य श्रेणीमध्ये ११२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये १२५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.९० टक्क्याच्यांवर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कु. मोहिनी भाष्कर नवघरे ९०.४० टक्के, कु. तानीया रविंद्र शेंडे ९७.२० टक्के, सुमित किशोर लुतडे ९६.४० टक्के, कु. राधिका अनिल चाफले ९५.६० टक्के, प्रणय कमलाकर लोणकर ९३.८० टक्के, श्रीनिवास रावसाहेब वाघमारे ९२.४० टक्के,कु.संपदा सतीश खोंड ९२.२० टक्के, कु. प्रतिक्षा संजय उमाटे ९२ टक्के, कु. वैष्णवी संदिप पिसे ९१.४० टक्के, कु. आयुषी अमर धनरेल ९१.४० टक्के, कु.साक्षी अरविंद रघाटाटे ९१.२० टक्के, कु.चेतना सुनिल टिपले ९०.८० टक्के, कु. मयुरी कैलास सावंकार ९०.४० टक्के, निशिकांत ईश्वर चंदनखेडे ९०.२० टक्के असे घवघवीत यश प्राप्त करून विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश धारकर,मुख्याध्यापक श्री. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.या यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री.गो. गो.राठी,उपाध्यक्ष श्री.श्या.भा. भीमनवार,शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सौ सु.स.देशपांडे, पर्यवेक्षक श्री.भ.तु.धोंगडे,जेष्ठ शिक्षक तथा सकाळ पाळीचे प्रमुख श्री.रा.ता.कारवटकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.